बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी या ठिकाणी अक्षरशः अख्खे गावच स्थलांतरीत करावे लागल्याची दुर्दैवी वेळ आली आहे,घराला तडे गेले,भिंती पडल्या,रस्ते खचले,पहावे तिकडे भेगा पडल्याचे चित्र असून गावकरी भयभीत झाले आहेत,आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कपिलधार वाडीला भेट देऊन पाहणी करत धीर सोडू नका,खचू नका म्हणत याबाबतीत मी स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर जागा उपलब्ध करून घेऊन पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून गावकऱ्यांना धीर दिला
कपिलधार वाडीला अक्षरशः निसर्गाचा कोपच झाला आहे प्रत्येक घराला तडे गेले,भिंती पडू लागल्या, रस्ते खचू लागले गावकरी भयभीत होऊन मिळेल ती वस्तू हातात घेऊन कपिलधार मंदिराकडे स्थलांतरित झाले शंभर उंबऱ्याचे असलेले हे गाव 500 ते 600 लोकसंख्या ज्यामध्ये महिला पुरुष आणि लहान लहान लेकरांचा समावेश आहे आयुष्यभर कष्टाने पै पै करून कमावलेल्या संसाराला सोडून घरादारासहित महिला वृद्ध गाव सोडून निघून गेले आहेत अशा संकटात फोटोसेशन करून आश्वासन देणाऱ्यांपेक्षा जयदत्त अण्णाच आपले पुनर्वसनाचे काम करू शकतात अशी खात्रीच या गावकऱ्यांना झाली भयभीत असलेल्या गावकऱ्यांनी माजी मंत्री क्षीरसागर यांची भेट घेऊन याबाबतीत आपण लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर आज रात्र झालेली असताना देखील त्यांनी कपिलधार वाढीच्या ग्रामस्थांना धीर दिला खचून जाऊ नका धीर सोडू नका असे सांगून याबाबतीत आपण प्रयत्न करत असल्याचे सांगून जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा खुलला होता, उपस्थित असलेल्या लहान लेकरांना आणि वृद्धांना बघून अक्षरशःडोळ्यात पाणी यावे अशी परिस्थिती आहे,यावेळी दिनकर कदम,चंद्रसेन नवले,विलास बडगे, अरुण डाके,नानासाहेब काकडे,सखाराम मस्के,ह भ प हरिदास जोगदंड,अरुण बोंगाणे, शिवाजी भुरे,बाळू मिटकरी,अशोक राऊत, केशव शिंदे,अच्युत रसाळ आणि गावकरी उपस्थित होते