Asia News Beed

मिल्लिया महाविद्यालयाचा शेख शायन अहमद याला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

मिल्लिया महाविद्यालयाचा शेख शायन अहमद याला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

बीड: येथील मिल्लिया कला,विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी खेळाडू शेख शायन अहमद याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व एस.डी.महाविद्यालय सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 90 किलो वजन गटात रौप्य पदक (सिल्वर मेडल) मिळवले.
या यशाबद्दल शेख शायन अहमद याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सलीम बिन महाफुज, सचिव श्रीमती खान सबीहा मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील,उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस.,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.फारूख सौदागर, डॉ. सय्यद हनीफ, इतिहास विभाग प्रमुख डॉ.शेख हुसेन, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रमेश वारे, ग्रंथपाल डॉ.आमेर सलीम, कार्यालयीन अधीक्षक श्री.शेख मोहम्मद रिजवान, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *