बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी दिवस” साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या हस्ते “हिंदी गझल विशेषांक” भित्तीपत्रक (वॉल मॅक्झिन) चे विमोचन करण्यात आले तसेच चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. चित्रकला स्पर्धे विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर मिर्झा असद बेग, प्रोफेसर पठाण ए.एम, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस, डॉ. शेख गफूर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रमेश वारे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर मिर्झा असद बेग यांनी केले. त्यांनी हिंदी भाषा व साहित्याचा विकास याबद्दल माहिती दिली. हिंदी समृद्ध भाषा असल्यामुळे आज हिचा विस्तार सर्व विश्वामध्ये झाला आहे. हिंदी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला असून देशात सर्व ठिकाणी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात येते.
हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असून हिंदी भाषेमध्ये गोडी व सहज पण आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी प्रत्येकाने भाषेचा सन्मान करावा, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदीचे मोठे योगदान असून हिंदी भाषेच्या विकासासाठी दैनंदिन व्यवहारात व प्रत्येक क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा वापर व्हावा असे सांगितले व सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.