दादा द्वेषाचा संग्राम नको सलोख्याचा भागवत हवा ,मुस्लिम भावना संतापल्या
बीड प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवावर झालेला लाठीचार्ज आणि भावना बद्दल अपशब्द वापरल्या नंतर ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप धार्मिक वक्तव्य करतात त्याच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते भागवत तावरे यांनी आय लव्ह मुहम्मद अशी पोस्ट करत पक्षाची भूमिका विशद केली . शिव शाहू फुले आंबेडकर या विचार धारेने पक्ष अजित दादांच्या नेतृत्वात सर्वांना सोबत घेऊन चालतो आहे . कुठल्या एका व्यक्तीचे वर्तन वा वक्तव्य ही पक्षीय भूमिका नेहमीच नसते ते कधी कधी त्या व्यक्तीचे व्यक्तिगत मत असते . भागवत तावरे यांनी नेहमीच सलोख्याची व हक्क देण्याची भूमिका बजावली आहे .काल त्यांनी फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट केल्या नंतर अनेकांनी संग्राम जगताप यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे .मुस्लिम बांधवातून आम्हाला द्वेष पसरवणारा संग्राम नको तर सलोखा वाढवणारा भागवत हवा अश्या भावना व्यक्त केल्या आहेत .
आय लव्ह मुहम्मद
सिर्फ मुस्लिम का मुहम्मद पे इजारा तो नही
बेशक , अल्लाह चे प्यारे रसूल पैगम्बर साहेबांचं जीवन आदर्श होते आम्ही कसे जगावे याचे मानक मापदंड निकष त्या जीवनात मिळतात .23 वर्षे ज्यांच्यावर कुराण नाजील म्हणजे उतरवले ते मुहम्मद पैगम्बर प्रेम करावे असेच आहेत .संत तुकाराम पासून ते स्वामी विवेकानंद पर्यंत मुहम्मद पैगम्बर कुराण बद्दल आदर शब्दबद्ध झाला आहे . मी जन्माने हिंदू आणि विठल भक्त निस्सीम माळ असलेला वारकरी आहे अन माझं मुहम्मद साहेबावर निस्सीम प्रेम आहे . आज आम्ही यावरून विभाजनवादी राजकारण करूच शकत नाही . परवा पूरग्रस्त भागात पक्ष प्रमुख अजित दादा पवार यांनी जी भूमिका शब्दबद्ध केली ती पक्षाची विचार सरणी आहे . नागपूर येथील नागपूर डिक्लेरेशन मध्ये 11 कलमी मसुदा मध्ये स्पष्ट आहे कि शिव शाहू फुले आंबेडकर हाच आमचा विचार आहे आणि यानुसार हिंदू मुस्लिम वा जातीय विभाजन हे आम्हाला मान्य नाही आणि हि आमची भूमिका नाही .छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व धर्म व अठरापगड जातीचा मनमिलाप आमची पक्षीय सनद आहे . महाराष्ट्रधर्म हा राष्ट्रवादी पक्षाचा अजेंडा आहे .मुस्लिम बांधवांना या बद्दल कुठलीही शंका नसावी कि विभाजनवादी धोरण आमचे नाही आणि नसेल . परवा मला प्रशांत डोरले या मित्राने देवी समोर उभा असलेला मुस्लिम युवकाचा फोटो फेसबुक ला पोस्ट केला मला आनंद वाटला कारण तोच भाव आहे माझा म्हणूनच आय लव्ह मुहम्मद म्हणताना मला आनंद वाटतो आहे .
राष्ट्रवादी पक्ष हा लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वधर्मसमभाव तत्वाने मार्गीत आहे .
*हम किसी दिन से हो काय ले किरदार तो है
*नाम लेवा है मुहम्मद के प्ररस्तार तो है
ईशक हो जाये किसीसे कोई चारा तो नही
सिर्फ मुस्लिम का मुहम्मद पे इजारा तो नही