बीड(प्रतिनिधी)
सध्या पावसाळा सुरू असुन सर्वत्र कडे जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे तलाव भरलेले आहेत त्यामुळे थोडे जरी पाउस पडले की नदी नालेंना पुर येत आहेत. नदी नाले तील पाणी पहाण्यासाठी लोकं नदी नाले वर येऊन गर्दी करु लागले आहेत. विशेष करून बीड शहरातील बिंदुसरा नदी, मोमीनपुरा नाला, तकीया मस्जिद नर्सरी रोड नाला आणि बालेपिर नाला या नालेवर पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी बिंदुसरा नदी वरील दगडी पुलावरून एक मुलाचे संतोलन बिघडल्यामुळे तो पुलावरून नदीत पडला होता डूबक्या घेत असताना तेथील काही तरुणांनी पुरात उड्या मारून त्या मुलाला वाचवण्यात यशस्वी झाले सदर मुलगा भाग्यवान होता म्हणून वाचला आहे म्हणून बीड शहरातील नागरिकांनी नम्र आवाहन करण्यात येते की आपण स्वःताला आणि मुलांना नदी नाले पासुन दुर ठेवावे असे नम्र आवाहन बीड नगरपरिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी केले आहे,