एशिया न्यूज बीड

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, उडीद आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने अपुऱ्या पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रेय भरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, अपुऱ्या पावसामुळे फुलोऱ्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाचे तसेच बोंड अवस्थेतील कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. अपुरे सिंचन व कमी पर्जन्यवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे पावसाअभावी नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची महसूल यंत्रणेमार्फत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची शासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शिवसंग्रामच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे,शहराध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कोटुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडितराव माने, योगेश शेळके ,युवक जिल्हाध्यक्ष सुनील कुटे, मनोज जाधव, गणेश मोरे, गणेश साबळे, चंद्रकांत देवकर, विठ्ठल ढोकणे, देविदास मेंगडे, नामदेव धांडे , लाला भाई, लक्ष्मण शिंदे, उमेश शिंदे, बाळू रांजवण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *