मिल्लीया महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक व्हावे- प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर
बीड: येथील मिल्लीया कला,विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दिनांक 11 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सन 2024-2025 तुकडी (बॅच) च्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ. के.एस.के.महाविद्यालय बीडचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस., परीक्षा विभाग प्रमुख डॉ. शेख गफूर अहमद, करिअर कट्टा विद्यार्थी संसद मुख्यमंत्री सय्यद रेहान यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी सौ.के.एस.के. महाविद्यालय बीडचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी समाज उपयोग कौशल्यपूर्ण शिक्षण व परिपूर्ण ज्ञान घ्यावे.नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा, सकारात्मक विचार केल्यास नवीन संकल्पना सुचतील. विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कार्य करावे व चांगले नागरिक व्हावे तसेच पुढे शिक्षण घेत राहावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करते, विविध शैक्षणिक सुविधा बरोबरच विद्यार्थी एक चांगला व्यक्ती व्हावा, त्याने समाज निर्मितीसाठी सहभाग घ्यावा यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोरील संधींचे विश्व अधिक व्यापक होते.विद्यार्थ्यांनी ज्ञानाची कास धरून बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जावे व आपल्या क्षेत्रात नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमानाचे भाव दिसून येत होते. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद व्यक्त केला.पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अरेबीक विभाग प्रमुख प्रोफेसर अब्दुल समद यांनी कुराण पठण करून केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर अब्दुल अनीस यांनी तर आभार उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, पदवी प्राप्त विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. पदवी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सलीमबीन महाफुज, सचिव श्रीमती खान सबीहा मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस., परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शेख गफूर, प्रोफेसर अब्दुल अनीस, सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


