विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व संशोधनपर उपक्रमांची रेलचेल
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव (प्रतिनिधी) : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांच्या वतीने खामगाव शहराचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, माजी खासदार, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे माजी अध्यक्ष तथा ‘खामगाव रत्न’ स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार, दि. १९ सप्टेंबर ते गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जयंती उत्सव सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध शैक्षणिक, संशोधनपर, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांमध्ये रक्तगट तपासणी, पोस्टर प्रदर्शन, उद्घाटन समारंभ, वृक्षारोपण, विविध क्रीडा स्पर्धा, ‘इनोव्हेट-२०२६’ नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शन, संशोधन पद्धती कार्यशाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन विविध स्पर्धा, प्राचीन व मराठा कालखंडातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा, रांगोळी, मेहंदी, पोस्टर स्पर्धा, माती कला, रक्तदान शिबिर तसेच वार्षिक पारितोषिक वितरण व समारोप समारंभाचा समावेश आहे. दि. १९ सप्टेंबर शनिवार रोजी जयंती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.०० वाजता प्राणीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत रक्तगट तपासणी व पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजता स्व. शंकररावजी बोबडे सभागृहात जयंती उत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुभाषजी बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), तसेच उद्घाटक म्हणून कर्नल ओमेश शुक्ला (सी.ओ.,१३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगाव), व प्रभारी प्राचार्य डॉ. एस. टी. वराडे उपस्थिती राहणार आहे. तथा विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व प्राध्यापक वृंद उपस्थित राहणार आहेत. दुपारी १.०० वाजता महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी ९.०० वाजता इनडोअर स्टेडियममध्ये तालुकास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस, टेनिस व बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या विविध उपक्रमांमध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दि. २० सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता जलतरण तलाव व महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जलतरण व क्रिकेटसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम घेण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी मा. श्री. शैलेंद्रजी मोहता (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), व मा. श्री. रविंद्रजी महर्षी (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २१ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजता भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत ‘इनोव्हेट-२०२६’ नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मा. डॉ. आनंदजी झुनझुनुवाला (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजता स्मार्ट रूम क्रमांक ८, येथे ‘संशोधन पद्धती कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी मा. डॉ. राजकुमारजी धानुका प्राध्यापक, माऊली इंजिनिअरिंग कॉलेज, शेगाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या वतीने सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मा. ॲड. अनिलजी व्यास (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २२ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजता स्मार्ट रूम क्रमांक ८, येथे संशोधन पद्धती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजता सेंटर ऑफ एक्सलन्स हॉलमध्ये ‘प्राचीन व मराठा कालखंडातील इतिहासातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी मा. श्री. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजता कनिष्ठ महाविद्यालय विभागात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांसाठी मा. डॉ. एन. एस. महल्ले (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २३ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजता स्व. शंकररावजी बोबडे सभागृहात जयंती उत्सव अंतर्गत वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या वादविवाद स्पर्धेचा विषय “भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आली आहे का?” असा आहे. या कार्यक्रमासाठी सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी ९.०० वाजता खोली क्रमांक ११० येथे रांगोळी, मेहंदी, पोस्टर स्पर्धा व माती कला या विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मा. श्रीमती नीताताई बोबडे (अध्यक्षा, निसर्ग संस्था खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २४ सप्टेंबर गुरुवार रोजी जयंती उत्सवाच्या अंतिम दिवशी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता भौतिकशास्त्र विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी मा. श्री. अशोकभाऊ सोनोने (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), व मा. श्री. राजेंद्रजी झांबड (सदस्य विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता स्व. शंकररावजी बोबडे सभागृहात स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव चा वार्षिक पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अजिंक्यदादा बोबडे (कोषाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), तथा प्रमुख पाहुणे मा. श्री अशोकजी झुनझुनवाला माजी उपाध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम या संपूर्ण जयंती उत्सव सप्ताहात विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम, क्रीडा, कला, सामाजिक जाणीव, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्तदान व वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांसोबतच संशोधन पद्धती कार्यशाळा आणि ‘इनोव्हेट-२०२६’ सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता व संशोधनवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या जयंती उत्सव सप्ताहाचे मार्गदर्शक मा. डॉ. सुभाषरावजी बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), तथा मा. डॉ. प्रशांतजी बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. जे. डी. पोरे, समन्वयक, विद्यार्थी विकास व सांस्कृतिक समिती तथा जयंती उत्सव यांच्या समन्वयातून हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जयंती उत्सव सप्ताहातील सर्व कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर व प्रा. डॉ. जे. डी. पोरे यांनी केले आहे.