शैक्षणिकवसंशोधनक्षेत्रातीलप्रदीर्घअनुभवाचेनेतृत्व; विदर्भशिक्षणप्रसारकमंडळाच्याअध्यक्षांकडूनस्वागतवशुभेच्छानवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. संजय वराडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी तांबट, संस्थेचे सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे तथा कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, तसेच विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी दिसत आहे.
नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. संजय वराडे यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, माजी प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, दिसत आहे.
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : स्थानिक नामांकित संस्था विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. संजय तुकाराम वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता मावळते प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांच्याकडून नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. संजय वराडे यांनी प्राचार्यपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले व त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मूळचे मलकापूर येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. संजय वराडे यांचा जन्म २१ मे १९६९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालय, नागपूर येथून १९९१ मध्ये बी.एस्सी. (कृषी) ही पदवी गुणवत्तापूर्वक प्राप्त केली. पुढे उच्च शिक्षणात गती घेत त्यांनी विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथून १९९४ मध्ये अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (एम.ए.) प्राप्त केली. अर्थशास्त्र विषयात एम.फिल. ही पदवी मिळवली. १९९९ मध्येच त्यांनी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच अर्थशास्त्र विषयाची ‘SET’ परीक्षा उत्तीर्ण आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून २०१० मध्ये अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट म्हणजेच पी.एच.डी. पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली. प्रा. डॉ. संजय वराडे यांनी १४ जानेवारी १९९७ रोजी गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक सेवेत प्रवेश केला. पदवी व पदव्युत्तर स्तरावर अध्यापनाचा त्यांना सुमारे २९ वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मोलाचे कार्य असून सध्या त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थी पी.एच.डी.चे संशोधन करीत आहेत. याशिवाय विविध विद्यापीठांमध्ये त्यांनी पी.एच.डी. संशोधकांचे विषयतज्ज्ञ (Subject Expert) तसेच परीक्षक म्हणूनही निरंतर काम केले असून सध्याही ते कार्यरत आहेत. सध्या ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना गो. से. महाविद्यालयातर्फे मानाचा ‘टिकमदासजी राठी आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२’ देऊन गौरविण्यात आले आहे. वैयक्तिक जीवनात वाचन, बौद्धिक संवाद व क्रीडा हे त्यांचे अत्यंत आवडीचे विषय आहेत. त्यांना शैक्षणिक कार्याचा वारसा घरातूनच लाभला असून प्रा. डॉ. संजय वराडे यांचे वडील प्राचार्य तुकाराम एकनाथ वराडे हे जनता महाविद्यालय, मलकापूर येथे राज्यशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुमारे १५ वर्षे अत्यंत निष्ठेने प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. प्राचार्यपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. संजय वराडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गो. से. महाविद्यालयाची समृद्ध शैक्षणिक परंपरा, गौरवशाली वारसा आणि लौकिक अधिक उंचावण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मूल्यवर्धित शिक्षणासोबतच संशोधन, कौशल्यविकास, रोजगारक्षमता आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा विशेष भर राहील. महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि सर्वांगीण विद्यार्थी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेचा शैक्षणिक दर्जा राष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षम करण्याचा माझा निरंतर प्रयत्न असेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांच्या सक्रिय सहकार्याने गो. से. महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रात अधिक भक्कम व अग्रगण्य स्थान मिळवून देण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी तांबट, संस्थेचे सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे तथा कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, तसेच विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.