एशिया न्यूज बीड

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष    समीर काझी यांना पितृशोक 

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष     समीर काझी यांना पितृशोक 

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष 

  समीर काझी यांना पितृशोक 

बीड, (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शफी काझी यांचे वडील गुलाम नबी कासमशा काझी यांचे मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नीसह फारुक काझी, शफी काझी, समीर काझी, जावेद काझी ही चार मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. गुलाम नबी काझी है अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील मूळ रहिवासी असून व्यवसायानिमित्त ते गेल्या अनेक वर्षांपूर्वी बीड येथे सहकुटुंब स्थायिक झाले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता बीड शहरातील तकिया मस्जिदमध्ये नमाज-ए-जनाजा अदा करण्यात येऊन परिसरातील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले गुलाम नबी काझी हे सर्व कुटुंबाला सोबत घेऊन चालणारे सरळ स्वभावाचे व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *