*पत्रकारांना प्रवानगी देऊन नगरपरिषद सभा Live दाखवा-खुर्शीद आलम”* ,. *नगराध्यक्ष व मुख्याधिकारीकडे तुतारी गटाची मागणी,*
, बीड(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब भाई उपस्थित होते, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशातील सर्वोच्च सभा म्हणजेच संसद भवन सभा व राज्यसभा आणि विधानपरिषद सभेचे live प्रसारण केले जाते आहे, अगदी याच पार्श्र्वभूमीवर बीड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बीड शहरातील नागरिकांसाठी live दाखवण्यात यावी म्हणजे बीड नगरपरिषद शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान नागरिकांसाठी नगरपरिषद काय निर्णय घेत आहेत आणि कोण कोणत्या योजना राबवत आहेत वगैरे याची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळू शकेल, नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा live दाखवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रेस मिडिया, सोशल मिडिया वगैरे यांना नगरपरिषद सभागृहात बसण्याची परवानगी देऊन त्यांना सभागृहात बसण्याची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तुतारी गटाच्या वतीने गटनेते खुर्शीद आलम यांनी केली आहे, या शिष्टमंडळात नगरसेवक अशोक काळे, नगरसेवक अय्युब खान पठाण, नगरसेवक अक्षय जाधव, नगरसेवक मसी भाई, नगरसेवक मोहसीन भाई, नगरसेवक रईस भाई आदी मान्यवर उपस्थित होते,


