एशिया न्यूज बीड

*धारूर मिल्लीया शाळेचे सहशिक्षक मोमीन फिरोज अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान* 

*धारूर मिल्लीया शाळेचे सहशिक्षक मोमीन फिरोज अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान* 

*धारूर मिल्लीया शाळेचे सहशिक्षक मोमीन फिरोज अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*

धारूर:

धारूर येथील मिल्लिया उर्दु माध्यमिक शाळेचे सहशिक्षक मोमीन फेरोज अहमद रशीद अहमद यांना आज दि.1-2-2026 रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे कार्यक्रम बीड येथील गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये थाटामाटात संपन्न झाले यावेळी उर्दू शिक्षक संघटनेचे राज्यअध्यक्ष एम ए गफार जिल्हाध्यक्ष शेख माजेदअहमद जिल्हा कार्याध्यक्ष खान अनवर एखबाल जिल्हा सचिव इस्माईल अय्युब ,माजी जिल्हाध्यक्ष मुजतबा खान व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ही उपस्थित होते त्यात फारूक पटेल गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट खुर्शीद आलम गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट , शफिक भाऊ जिल्हाध्यक्ष एम आय एम, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर ,मुक्रम जान पठाण मिल्लिया माध्यमिक शाळा धारूर चे मुख्याध्यापक काजी जैनुल आबेदीन मिल्लिया शाळेचे सर्व शिक्षक वृंद सेवानिवृत्त शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते हे पुरस्कार प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *