एशिया न्यूज बीड

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा 31 जुलै पूर्वी भरावा :- अनिल बोर्डे 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा 31 जुलै पूर्वी भरावा :- अनिल बोर्डे 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा 31 जुलै पूर्वी भरावा :- अनिल बोर्डे 

गेवराई (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू झाली आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी ग्राहकांनी मुदतीत विमा भरून लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, बीड जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे व तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी संयुक्तपणे केले आहे.

 तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात पिक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

 पिक विम्याचे नवीन नियम :-

1) किमान क्षेत्र : किमान दहा गुंठे क्षेत्रावरील पिकाचा विमा भरता येणार. त्यापेक्षा कमी क्षेत्राचा विमा स्वीकारला जाणार नाही.

2) पेरणी केलेले पीक : शेतकरी ग्राहकाने प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकाचा विमा भरावा. चुकीच्या पिकाचा विमा भरल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.

3) हप्त्याचे दर : सोयाबीन पिकासाठी संरक्षित रकमेच्या 2% तर कापूस पिकासाठी पाच टक्के हप्ता निश्चित करण्यात आला आहे.

4) डिजिटल प्रक्रिया बंधनकारक : विमा अर्ज भरताना फॉर्मर आयडी अनिवार्य आहे. तसेच ई पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲप द्वारे करणे बंधनकारक आहे.

 चुकीची माहिती दिल्यास कारवाई शासकीय जमीन, गायरान, स्मशानभूमी, तलाव देवस्थान यासारख्या अयोग्य जागेवर चुकीच्या पद्धतीने विमा भरल्याचे आढळल्यास संबंधित लाभार्थ्याचे आधार कार्ड 5 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येईल. तसेच त्या कालावधीत शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *