एशिया न्यूज बीड

संस्थाचालकांनी शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्यापेक्षा शासनाकडून 5 टक्के वेतनेत्तर अनुदान स्वतः लढा देऊन मिळवावे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाचा जाहीर निषेध-खंडेराव जगदाळे 

संस्थाचालकांनी शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्यापेक्षा शासनाकडून 5 टक्के वेतनेत्तर अनुदान स्वतः लढा देऊन मिळवावे  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाचा जाहीर निषेध-खंडेराव जगदाळे 

संस्थाचालकांनी शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्यापेक्षा शासनाकडून 5 टक्के वेतनेत्तर अनुदान स्वतः लढा देऊन मिळवावे

  • महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाचा जाहीर निषेध-खंडेराव जगदाळे

बीड दि.२३(प्रतिनिधी)- शिक्षकांच्या पगारातून 5 टक्के रक्कम काढण्यास शासनाने मंजुरी द्यावी असा ठराव शिक्षण संस्था चालक मंडळाने राज्यस्तरीय बैठकीत घेतला आहे. त्यांच्या या ठरावाचा

विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी जाहीर निषेध करत संस्थाचालकांनी शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्यापेक्षा शासनाकडून 5 टक्के वेतनेत्तर अनुदान स्वतः लढा देऊन मिळवावे असे थेट आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाला प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात खंडेराव जगदाळे सर म्हणतात की, या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, डॉ पतंगराव कदम यांच्या सारख्या अनेक संस्था चालकांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राज्यातील अनेक संस्थाचालकांनी गोरगरिबांना शिक्षण व सामान्य कुटुंबातील नागरिकांना शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची नोकरी मिळावी म्हणून कसलीही आर्थिक अपेक्षा न करता लाखो गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना शिक्षकांच्या नोकऱ्या दिल्या. परंतु काही बोटावर मोजता येतील अशा काही संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे प्रामाणिक संस्था चालक बदनाम होत आहेत, आज राज्यात कोणताही शैक्षणिक प्रश्न निर्माण झाला की शिक्षकच रस्त्यावर उतरतात,आंदोलन करतात, कोणताही परिणाम झाला तरी त्यामध्ये त्यांनाच सामोरे जावे लागते. काही संस्था चालक कसा त्रास देतात, किती त्रास देतात, त्यामुळे अनेक शिक्षक- कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जीव गेला तरी त्यांना हे संस्थाचालक सोडत नाहीत.

या सर्व बाबींचा विचार करून शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्यापेक्षा शासनाकडून 5 टक्के वेतनेत्तर अनुदान स्वतः लढा देऊन मिळवावे असे आवाहन खंडेराव जगदाळे यांनी शिक्षण संस्थाचालक महासंघाला केले आहे.

चौकट

संस्था चालक महामंडळाचे कार्याध्यक्ष श्री विजय नवल पाटील यांचे टक्केवारी मागण्याचे धाडस कसे?

 

शिक्षकांच्या पगारातून टक्केवारी मागण्याचा किंवा असा ठराव ज्यांनी मांडला असेल त्यावेळी कार्याध्यक्ष गप्प का राहिले, शिक्षक व कर्मचारी यांच्या पगारातून टक्केवारी मागण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला ? असा संतप्त सवाल विचारत तुम्ही शिक्षक, कर्मचारी यांना वेठीस धरू नका अन्यथा आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी खंडेराव जगदाळे यांनी दिला.

संस्था चालक महामंडळ बरखास्त करा- खंडेराव जगदाळे

सध्याचे संस्था चालक महामंडळ शिक्षकांच्या आणि कर्मचा-यांच्या हिताचे नाही. तर हे प्रामाणिक संस्था चालक यांना बदनाम करणारे आहे. त्यामुळे हे संस्था चालक महामंडळ बरखास्त करावे. हे संस्थाचालक महामंडळ बरखास्त झाल्यावर तातडीने राज्यातील प्रमुख संस्था चालकांना घेऊन नवीन संस्था चालक महामंडळ स्थापन करण्याबाबत प्रयत्न करणार असल्या विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्यपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.

____________________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *