*शेख सादिक रिजवान हुसेन याचा पहिला रोजा पूर्ण.*
दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख ईस्माईल यांचे नातु, शेख सादिक रिजवान हुसेन याने वयाच्या सातव्या वर्षी लहान वयात आपला आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करुन परिसरात कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे.सादिक हा रिजवान सर यांचा मुलगा आहे.उन्हाच्या पार्श्वभूमीवरही सादिक ने दिवसभर पाण्याचा थेंब न पिता सुमारे 14 तासांचा कडक रोजा पूर्ण केला.त्याच्या या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिवस भर त्याने नमाज, दुवा, कुराण पठण यांमध्ये वेळ व्यतीत केला.योग्य मार्गदर्शन, चांगले संस्कार आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास मुले लहान वयातही संयम, शिस्त आणि श्रद्धा यांसारखे मूल्ये आत्मसात करू शकतात.त्याच्या या पहिल्या रोजाचा सर्वांना अभिमान वाटत आहे.सादिक च्या उज्वल भविष्यासाठी आजी -आजोबा, काका-काकी, आत्या-मामा,आई-वडील नातेवाईक, मित्र मंडळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.


