- *🌙 काझी मुहिबुर्रहमान मुशाहेद यांचा पहिला रोजा उत्साहात पूर्ण*
बीड (वार्ताहर):
दिनांक १ मार्च, रविवार रोजी पवित्र रमजान महिन्यात काझी मुहिबुर्रहमान मुशाहेद यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) अत्यंत श्रद्धा, संयम आणि उत्साहाने पूर्ण केला. लहान वयातच धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांनी रोजा पूर्ण केल्याने कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुहिबुर्रहमान हे हाजी काझी अजिजोद्दीन (धोंडराईकर), निवृत्त पोस्टमॅन यांचे नातू तसेच काझी मुशाहेद अजिज, जिल्हाध्यक्ष — अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, बीड यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या धार्मिक व प्रेरणादायी कृतीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी त्यांचे ताया बाबा काझी अक्रमोद्दीन (महाराष्ट्र ऑप्टिकल्स, गेवराई), चाचा जान काझी वझीरोद्दीन (MSRTC, बीड) तसेच चाचु काझी शाहेद (महाराष्ट्र ऑप्टिकल्स, बीड) यांनी विशेष अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. नातेवाईक व मित्रपरिवाराकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत मुहिबुर्रहमान यांनी दाखवलेला हा आदर्श इतर बालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


