एशिया न्यूज बीड

बीड शहरातील लाईट सुरळीत ठेवा- गटनेते खुर्शीद आलम,* *लाईट संदर्भात तुतारी गटाने घेतली मुख्य अभियंताची भेट,* 

बीड शहरातील लाईट सुरळीत ठेवा- गटनेते खुर्शीद आलम,*  *लाईट संदर्भात तुतारी गटाने घेतली मुख्य अभियंताची भेट,* 

*बीड शहरातील लाईट सुरळीत ठेवा- गटनेते खुर्शीद आलम,*

*लाईट संदर्भात तुतारी गटाने घेतली मुख्य अभियंताची भेट,*

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील अनेक भागात लाईट सुरळीत नसल्याने अंधार पसरलेला दिसुन येत आहेत, अनेक भागात लाईट जाण्याचा आणि येण्याचा कोणताही वेळ राहिलेला नाही, महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत, सनासुधीच्या वेळेस सुद्धा लाईट सुरळीत मिळत नाही, शहरातील अनेक डि.पी. चे किटकॅट फुटुन तुकडे तुकडे झालेले आहेत तर अनेक ठिकाणी कुजलेले खंबे असुन ते तुटून पडले तर मोठ्ठी जिवितहानी होण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी विद्युत तार लोंबकळत आहे त्यामुळे सुद्धा जिवितहानी होण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी विद्युत खंबे नसल्यामुळे लोकांना पाच पाचशे फुटांवरून विद्युत मिटर घ्यावे लागत आहेत, लोकसंख्या अनुसार डि.पी.नसल्याने व्होल्टेज कमी जास्त होऊन इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळुन जाते, अनेक वर्षांपासून ची विद्युत तारे कधी तुटून अंगावर पडेल याचा नेम नाही अश्या विविध तक्रारी घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वात नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने म.वि.वि.कं. चे मुख्य अभियंता साहेब यांची भेट घेतली, म‌.वि.वि.चे मुख्य अभियंता साहेब यांनी वरील समस्या संदर्भात विशेष लक्ष देऊन कामे मार्गी लागेल असे आश्वासन दिले आहे, यावेळी गटनेते नगरसेवक खुर्शीद आलम, नगरसेवक भारत कांबळे, नगरसेवक अथहर भाई, नगरसेवक जाधव साहेब, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक शेख अफसर, नगरसेवक मसुद खान, नगरसेवक रईस भाई, नगरसेवक मसी मोमीन, नगरसेवक उल्हास ग्राम, नगरसेवक पिंगळे साहेब, नगरसेवक काळे साहेब आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे पी.ए. चौरे साहेब उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *