एशिया न्यूज बीड

हृदय पिळवटून टाकणारी घटना*

हृदय पिळवटून टाकणारी घटना*

*हृदय पिळवटून टाकणारी घटना*

बीड

23/02/26 रोजी सकाळी 10:00 फोन आला “35 40 वर्ष वयाचा एक तरुण रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. तुम्ही लवकर या आणि त्याची व्यवस्था करा. लवकर उपचार नाही मिळाले तो मरून जाईल, ही तुमची जिम्मेदारी आहे. आपण अनाथ बेघरांना सांभाळतात म्हणून” मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहचलो तर खरोखर सदर व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असताना दिसली. तो मुलगा वाचल असे वाटत नव्हते तरी प्रयत्न करायचे ठरवले. मी शहर पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेब यांना फोन लावला. त्यांनी देखील कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता पोलीस हवालदार गर्जे यांना पाठवून दिले. त्यांनी आणि मी तेथे बघत उभ्या असलेल्या अनेक लोकांच्या मदतीने सदर व्यक्तीला उचलून रिक्षामध्ये बसवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. डॉक्टरांनी विचारले त्याचे नातेवाईक कोणी आहेत का? त्याचं नाव काय? मलाही त्याचे नाव माहित नव्हते. केस पेपर वर माझे नाव आणि माझा मोबाईल नंबर डॉक्टरांनी नोंद केला आणि त्यांना पोस्टमार्टम रूममध्ये ठेवण्यात आले. जेव्हा

त्या व्यक्तीला आम्ही मदत करत होतो तेव्हा काही लोक आपापसात चर्चा करत होते या व्यक्तीला कॅन्सल झालेला होता. तोंडात जीभ नसल्याने त्याला बोलता येत नाही. त्याला नातेवाईक आहेत, परंतु ते त्याला बघत नाहीत. तो या भाजी मंडई मध्येच बिगारी काम करत होता. त्याला कॅन्सर असल्यामुळे घरातील लोक त्याला जवळ करत नव्हते. काही दिवसापूर्वी जिव्हाळा केंद्रामध्ये तो राहून गेला होता. प्रकृती बरी नसल्याने आम्ही त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर तो स्वतः घरी जातो म्हणून गेला होता. आम्ही देखील त्याला घरी जाण्याची परवानगी दिली होती. शेवटच्या दिवसात त्याला आसरा देण्याचे, त्यांना सांभाळण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आत्ता लवकरच शहर पोलीस स्टेशन आणि आम्ही त्यांचे नातेवाईक शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करू, परंतु शेवटच्या क्षणाला रक्ताच्या नात्यातील कुणाचीही मदत मिळाली नाही. असे का घडले? याचे उत्तर माझ्या मते त्या व्यक्तीमध्ये असलेले व्यसन असावं असं मला वाटते. व्यसनामुळे कुटुंब देखील साथ देत नाही याचे जिवंत उदाहरण मी आज जवळून पाहिले. शेवटच्या क्षणाला देखील अनेक लोक मदत न करता आम्हाला फोन करून आमचे काय कर्तव्य आहे ते सांगतात अशावेळी मनाला वाईट वाटते परंतु अशा व्यक्तींना आपण कुठेतरी मदत करतो याचेही समाधान वाटते. सदर व्यक्तीसाठी जिव्हाळा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *