एशिया न्यूज बीड

मुस्लिम समाजाने अन्यायाविरोधात एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा मुस्लिम समाज एकजूट झाल्यास मी मैदानात उतरणार मनोजदादा जरांगे

मुस्लिम समाजाने अन्यायाविरोधात एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा मुस्लिम समाज एकजूट झाल्यास मी मैदानात उतरणार मनोजदादा जरांगे

मुस्लिम समाजाने अन्यायाविरोधात एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा मुस्लिम समाज एकजूट झाल्यास मी मैदानात उतरणार मनोजदादा जरांगे

बीड (प्रतिनिधी) मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढत असल्याने त्याला पायबंद करण्यासाठी अल्पसंख्याक संरक्षण कायदा करण्यात यावा, यासाठी होणा-या आंदोलनाला मराठा संघर्षयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा द्यावा म्हणून प्रा.इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखालील अल्पसंख्यांक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने बकरीदच्या दिवशी गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. शासनाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या जुन महिन्यात मुंबई येथील आझाद मैदानावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्यावेळी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची शिष्टमडळाने भेट घेतली व एक मोठा भाऊ म्हणून आम्हाला खंबीरपणे साथ द्यावी, अशी विंनती केली.

      सत्ताधाऱ्यांच्या अन्याय-अत्याचाराविरोधात देशातील व राज्यातील मुस्लिम समाजाने एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा. समस्त मुस्लिम समाजाची एकजूट झाल्यास मी मुस्लिम बांधवांसोबत दंड थोपटून मैदानात उतरणार आहे, असा खणखणीत इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मुस्लिम बांधवांच्या गटबाजीचा व आपसातील मतभेदाचा गैरफायदा घेतला जात असून त्यांना टार्गेट केले जात आहे. 

      सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही निमित्त करून मुस्लिम समाजाला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरवरून एकत्र दिसणारा मुस्लिम समाज प्रत्यक्षात मैदानात उतरून एकत्र येत नसल्याने तो अन्यायाचा शिकार होत आहे. त्यामुळे भारत देशातील व विशेषतः महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाने सत्ताधाऱ्यांच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा. मुस्लिम समाजाची एकजूट झाल्यास कोणाचीही या समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही आणि कोणतीही शक्ती झुकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक दिवस पोटापाण्याचा प्रश्न व राजकीय जोडे बाजूला सारून सर्वांनी एकत्र यावे. मुस्लिम समाजाची एकजूट झल्यास मी सुद्धा मुस्लिम समाजासोबत दंड थोपटून मैदानात उतरणार आहे, असा खणखणीत इशारा जरांगे पाटलांनी दिला.

     देशात व राज्यात अल्पसंख्याक समाज व विशेषतः मुस्लिम समाजाविरोधात होणारे जातीय हल्ले, मॉब लिंचिंग, हेटस्पीच, राष्ट्रपुरुषांची, संतांची विटंबना, धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, वेशभूषा, खानपानावर होणारे हल्ले, बुलडोजर कार्यवाही सोशलमीडियाच्या माध्यमातून होणारे हल्ले रोखण्यासाठी व या हल्ल्यापासून समाजाचे संरक्षण करण्यासाठी राज्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनविण्याकरिता प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर पावसाळी अधिवेशनाच्यावेळी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती या भेटी दरम्यान शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिली. या आंदोलनाला जरांगे पाटलांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला व भविष्यात मुस्लिम समाजासोबत राहुन या समाजाला न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *