एशिया न्यूज बीड

मुस्लिम संरक्षण कायदयासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा जिल्हा दौरा सपन्न लवकरच राज्यदौरा सुरु करणार 

मुस्लिम संरक्षण कायदयासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा जिल्हा दौरा सपन्न लवकरच राज्यदौरा सुरु करणार 

मुस्लिम संरक्षण कायदयासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा जिल्हा दौरा सपन्न लवकरच राज्यदौरा सुरु करणार 

ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी व जुन मध्ये होणा-या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी मुंबई येथील आजाद मैदानावर होणा-या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीची टीम प्रा. इलियास इनामदार सर यांच्या नेतृत्वाखाली व मुज्तबा अहमद खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हयातील अनेक समाजसेवक राजकीय नेते उलेमा इकराम सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांची भेटीगाठी घेण्यात आल्या.

     आता पर्यंत गेवराई माजलगांव धारुर परळी अंबाजोगाई नेकनुर मांजरसुंबा रायमोह शिरुर आष्टी जामखेड पाटोदा याठिकाणी कॉर्नर मिटिंग घेवून देशात व राज्यात अल्पसंख्याक समाज व विशेषतः मुस्लिम समाजाविरोधात होणारे जातीय हल्ले, मॉब लिंचिंग, हेटस्पीच, राष्ट्रपुरुषांची, संतांची विटंबना, धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, वेशभूषा, खानपानावर होणारे हल्ले, बुलडोजर कार्यवाही सोशलमीडियाच्या माध्यमातून होणारे हल्ले रोखण्यासाठी व या हल्ल्यापासून समाजाचे संरक्षण करण्यासाठी राज्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनविण्याकरिता समिती निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार, मुज्तबा अहमद खान सर, शेख मुसा सर व ॲड. मोमीन अखील यांनी भेटी ठिकाणी माहिती दिली.

     अल्पसंख्यांक समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी समाजामध्ये एकजुट होणे गरजेचे आहे आता पर्यंत आम्ही स्वतासाठी जगलो पण आता वेळ आलेली आहे समाजासाठी जगण्याची समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही लढा उभा करण्याची मी चा जुता पायातुन काढून आम्ही म्हणून लढा उभा करु व समाजाच्या संरक्षणासाठी कायदा करावा हा दबाव सरकारवर एकजुटीने बनवू असे आवाहन ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.

                            

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *