एशिया न्यूज बीड

नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी तुतारी गट आक्रमक, रस्त्यावर उतरणार-खुर्शीद आलम, ,, मुख्याधिकारी सोबत आढावा बैठकीत तुतारी चे सर्व नगरसेवकांची उपस्थित,*

नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी तुतारी गट आक्रमक, रस्त्यावर उतरणार-खुर्शीद आलम, ,, मुख्याधिकारी सोबत आढावा बैठकीत तुतारी चे सर्व नगरसेवकांची उपस्थित,*

*नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी तुतारी गट आक्रमक, रस्त्यावर उतरणार-खुर्शीद आलम, ,, मुख्याधिकारी सोबत आढावा बैठकीत तुतारी चे सर्व नगरसेवकांची उपस्थित,*

,, बीड (प्रतिनिधी) मानसुन सुरू झाले असलेतरी बीड नगर परिषदेतील सत्ताधारी आणि नगरपरिषदने स्वच्छता.लाईट.पाणी आणि विकासासाठी आवश्यक कामासंदर्भात कुठलेच उपाय योजना हाती घेतलेली दिसुन येत नाहीये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टी गटनेते खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वात बीड शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी चे सर्व नगरसेवकांनी आज मुख्याधिकारी साहेब यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत नगरसेवकांनी मुद्देशिर चर्चा करून निवेदन दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की बीड शहरातील स्वच्छता मानसुन पुर्व मोठं नाले व गटार सफाई करून घ्यावी, बीड शहरात सुरळीतपणे पाणी पुरवठा करावा, शहरातील पथदिवे चालु करुन घ्यावेत, सर्व कब्रस्तान व समशानभूमी मध्ये हाय माॅस्ट बसवावे, संस्कार शाळेसमोरील रस्त्यावरील मंडई अहेल्याबाई होळकर सभागृहाच्या प्रांगणात स्थलांतरित करावे, बीड शहरातील रोड रस्ते विकास कामे त्वरित सुरू करावे, अम्रतजल योजना पूर्ण झाल्याशिवाय handwork करून घेऊ नाय, आठवडी बाजारामुळे सुभाष रोड ट्राफिक जाम होतो म्हणून सदर भाजीपाला विक्रेत्यांना यशवंत उद्यानाच्या पाठीमागे किंवा विजय टाकिजच्या पुर्व बाजू व बिंदुसरा नदीच्या पश्चिम बाजुस असलेल्या रस्त्यावर बसवावे, कामगारांना कामगार प्रमाणात पत्र वेळेवर द्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुरू करावे, विवाह नोंदणी वेळेवर करून प्रमाणपत्र द्यावे, आवश्यक रोडक्रॉसींग त्वरित बांधून घ्यावे, जन्म-मृत्यू प्रमाण पत्र व इतर प्रमाण पत्रे वेळेवर देण्यात यावे, या व इतर नागरीकांच्या मुलभूत सुविधा संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अश्या विविध मागण्या मांडल्या आहेत, वरील सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष द्यावे नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदपवार गटाचे सर्व नगरसेवक नागरिकांच्या मुलभूत हक्कांसाठी आंदोलन करेल असा इशारा तुतारी गटाच्या वतीने मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात आला आहे. यावेळी गटनेते खुर्शीद आलम, नगरसेवक भारत कांबळे, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक शेख अथहर, नगरसेवक अशोक काळे, नगरसेवक शेख अफसर, किशोर पिंगळे, नगरसेवक मसुद खान, नगरसेवक शेख रईस, नगरसेवक जाधव साहेब, नगरसेवक मसी भाई, नगरसेवक शेख रोहिल, नगरसेवक मोमीन मोहसीन, नगरसेवक ग्राम पाटील यांच्या सह सर्व नगरसेवक उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *