एशिया न्यूज बीड

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने कॅनॉल रोड परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने कॅनॉल रोड परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने कॅनॉल रोड परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

 

बीड (प्रतिनिधी) आज समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अंबिका चौक ते पोस्टमन कॉलनी, कॅनॉल रोड परिसरात ही स्वच्छता माहिम राबवण्यात आली. याउपक्रमातून गाडगेबाबांच्या स्वच्छता व समाजप्रबोधनाच्या परंपरेचा खरा आदर्श जपण्यात आला.

 

या स्वच्छता मोहिमेचे आयोजन शिवसंग्रामच्या महिला शहराध्यक्ष संगीता ठोसर व शिवसंग्राम नेते हरिश्चंद्र ठोसर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश आचरणात आणत परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश लोकनेते विनायक मेटे यांनी बीड परिसरात बिंदुसरा स्वच्छता मोहीम तसेच शहर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जोपासला होता. त्याच वसा-वारशाने प्रेरित होऊन ठोसर दांपत्याने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

या स्वच्छता मोहिमेला शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या समवेत शिवसेनेचे शहराध्यक्ष सुहास पाटील, कैलास शेजाळ तसेच अशोक लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पसरला असून स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *