खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित स्वर्गीय अॅड. शंकररावजी बोबडे ज्ञान मंदिर, जी. एस. कॉलेज कॅम्पस, नांदुरा रोड, खामगाव या आधुनिक शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ झाला असून पालक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जी. एस. कॉलेज कॅम्पस, नांदुरा रोड, खामगाव येथे सुरू करण्यात आलेली ही संस्था आधुनिक, गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. सीबीएसई पॅटर्न आणि Physics Wallah School Curriculum वर आधारित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील उच्च शिक्षणासाठी मजबूत पाया निर्माण होणार असून स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्यावर भर दिला जात आहे. Physics Wallah स्व. अॅड. शंकररावजी बोबडे ज्ञान मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व परवडणारे शिक्षण उपलब्ध करून दिले जाते, ज्यामुळे NEET, JEE आणि इतर स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी केली जाते. अनुभवी शिक्षकवर्ग, डिजिटल शिक्षण पद्धती आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मजबूत संकल्पना समजून उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी येथे मिळते. शाळेमध्ये विज्ञान आणि गणित विषयांचा मजबूत पाया तयार करण्यासाठी संकल्पनाधारित व प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयांचे स्पष्ट आकलन व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केले जाणार आहे. डिजिटल शिक्षण पद्धती, स्मार्ट क्लासरूम, संवादात्मक शिक्षण आणि नवोपक्रमशील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची सुरुवातीपासून तयारी व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. STEM आधारित शिक्षणामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. पालकांच्या सोयीसाठी बस सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची विशेष काळजी घेतली जाणार आहे. अनुभवी व गुणवंत शिक्षकवर्ग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीमुळे ही संस्था परिसरातील पालकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8329580520, 9172319399, 9309291650 आणि 7387666710 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. स्व. अॅड. शंकररावजी बोबडे ज्ञान मंदिरचे अध्यक्ष मा. डॉ. प्रशांतजी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे. संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना उत्तम व सर्वांगीण शिक्षण देऊन घडविले जाते. तसेच सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, प्रेरणादायी व सर्वांगीण विकासाला पूरक असे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या संधीचा पालक व विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करावी, अशी विनंती करण्यात येते.