खामगाव : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न तथा विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव मध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रथम वर्ष बी. ए., बी. एस्सी. व बी. कॉम. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाभिमुख वातावरण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. सन १९४७ पासून शैक्षणिक परंपरा जपणाऱ्या या महाविद्यालयास ‘NAAC’ कडून ‘बी++’ दर्जा प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. महाविद्यालयात पी.एच.डी. रिसर्च सेंटरची सुविधा असून अनेक विषयांमध्ये संशोधन केंद्र कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा अंतर्गत ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ असलेले बुलढाणा जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय असल्याचा विशेष गौरव संस्थेला प्राप्त आहे. प्रथम वर्ष बी. ए. अभ्यासक्रमात उर्दू भाषा व उर्दू साहित्य, अर्थशास्त्र, इंग्रजी भाषा व साहित्य, हिंदी भाषा व साहित्य, इतिहास, गृहअर्थशास्त्र, मराठी भाषा व साहित्य, फारसी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, संस्कृत भाषा व साहित्य, हे विषय उपलब्ध आहेत. बी. एस्सी अभ्यासक्रमात वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, मायक्रोबायोलॉजी तसेच संगणक अनुप्रयोग व्होकेशनल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी. कॉम. अभ्यासक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक वाणिज्य शिक्षणाची संधी मिळत आहे. महाविद्यालयात बी.एस्सी. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बी.सी.ए. आणि डी-टॅक्स यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. तसेच महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी एम.ए. (अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.कॉम. (मराठी व इंग्रजी माध्यम) तसेच एम.एस्सी. (रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संशोधन क्षेत्रातही महाविद्यालयाने विशेष प्रगती साधली असून उर्दू भाषा, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, अर्थशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र तसेच वाणिज्य या विषयांमध्ये पी.एच.डी. संशोधन केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. उच्च शिक्षण व संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय उत्कृष्ट शैक्षणिक व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे। महाविद्यालयाच्या आधुनिक सुविधांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लँग्वेज लॅबोरेटरी, विशाल ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र इंटरनेट कक्ष, विभागीय ग्रंथालय सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, NEET व JEE परीक्षा मार्गदर्शन, विशाल क्रीडांगण, इनडोअर स्टेडियम, शूटिंग अँड आर्चरी सुविधा, इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेल, ऑक्सिजन पार्क, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, विद्यार्थी कॅन्टीन तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. महाविद्यालय परिसरात बॉटनिकल गार्डन व जलतरण तलावाचीही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मध्ये १६० जागा तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये २०० जागा उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी Inspire Fellowship योजना, GOI व Free ship शिष्यवृत्ती तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असून गरीब, होतकरू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात येतात. खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहन व शिष्यवृत्तीची सुविधाही महाविद्यालयात उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे स्वतःचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, ABC अकाउंट (Digi Locker) व राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरावा. प्रवेश अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जमा करणे आवश्यक राहील. प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या बदल करण्याचा अधिकार प्राचार्यांना राखीव असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी कला विभागाचे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख (9422926544), प्रा. डॉ. एच. ए. भोसले (8329674918), प्रा. एस. एम. शिंदे (8805675535), विज्ञान विभागाचे प्रभारी प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन (9421473565), प्रा. डॉ. एस. पी. हरगुणानी (9421882676), प्रा. डॉ. व्ही. एस. आठवर (9422884584), प्रा. एस.एम. शिंगणे (9422139644),वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. डी. एन. व्यास (9423129696), प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड (9370312270), प्रा. एस. आर. ठेंग (9130323613), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालय विभागासाठी प्रा. एस. डी. वाघ (9049658012), प्रा. पी. डी. कायपेल्लीवार (9765129765), प्रा. पी. एन. खरात (7218860258), यांच्याशी संपर्क साधता येईल. वरिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी श्री. राहुल कडवकार (९८३४०१३११६), श्री. दिपक लाहुडकर (९०११५२६०८७), कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी श्री. एस. बी. भिसे (९४०५४५५५३३), श्री. संदिप वानखेडे (९९२२७४६२२६), राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशीप श्री. ए. बी. पाटील – ९०११८७३५५९ तसेच ऑनलाइन प्रवेश अर्ज संबंधित माहितीसाठी कु. भाग्यश्री सापधरे (७०२८५३६९५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार असून अधिक माहितीसाठी गो. से. महाविद्यालय, खामगावच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे।