एशिया न्यूज बीड

मिल्लीया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग अठरा तासांचे अभ्यास अभियान

मिल्लीया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग अठरा तासांचे अभ्यास अभियान

मिल्लीया महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सलग अठरा तासांचे अभ्यास अभिया

 

बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तासांचे अभ्यास अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस, ग्रंथपाल डॉ.आमेर सलीम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्राध्यापक शोएब पिरजादे, डॉ. शामल जाधव यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून आपले भविष्य घडवावे असे आवाहन केले. ग्रंथपाल डॉ.आमेर सलीम यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची सवय वाढवणे, सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय लागावी, एकाग्रता वाढावी, वेळेचे नियोजन कौशल्य विकसित व्हावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांची जाणीव करून देणे हा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास विविध विषयांचा अभ्यास करून या अभियानात सहभाग नोंदविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दलची आवड निर्माण झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.आमेर सलीम यांनी सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैन एस.एस. व इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर अब्दुल अनिस व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *