एशिया न्यूज बीड

गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे बीसीए प्रवेशासाठी सुवर्णसंधी

गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे बीसीए प्रवेशासाठी सुवर्णसंधी

PCM व PCB विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

खामगाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीसीए व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेला (CAP) सुरुवात केली आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे PCM तसेच PCB गटातील MHT-CET परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात Artificial Intelligence & Machine Learning (AI & ML) तसेच Data Science या रोजगाराभिमुख विशेष अभ्यासक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक संगणक शिक्षणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि आधुनिक आयटी तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत १६ जुलै असून विद्यार्थ्यांनी वेळेत CAP नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा कागदपत्र पडताळणीसाठी ई-स्क्रुटिनी (ऑनलाइन) तसेच प्रत्यक्ष पडताळणी असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ई-स्क्रुटिनीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, तर प्रत्यक्ष पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे विशेष प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत MHT-CET CAP Registration, ऑनलाइन अर्ज भरणे,  प्राधान्यक्रम (Option Form) भरणे, प्रवेश प्रक्रियेचे नियोजन तसेच संपूर्ण प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी केले आहे.
महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्वतयारीने तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये एसएससी व एचएससी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, MHT-CET गुणपत्रिका, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र (TFWS व शिष्यवृत्तीसाठी), EWS प्रमाणपत्र, शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, गॅप प्रमाणपत्र तसेच अल्पसंख्याक प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह त्यांच्या छायांकित प्रतीही सोबत ठेवाव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, बीसीए हा आजच्या डिजिटल युगातील अत्यंत मागणी असलेला व्यावसायिक अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना Artificial Intelligence, Machine Learning, Data Science, Software Development, Cyber Security, Cloud Computing, Web Development, Mobile Application Development यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या व्यापक संधी उपलब्ध होतात. देश-विदेशातील आयटी कंपन्या, स्टार्टअप्स, बँकिंग, ई-कॉमर्स, सरकारी व खासगी क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेता बीसीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
महाविद्यालयात प्रवेशासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभवी प्राध्यापकांकडून वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन केले जात असून, प्रवेश प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी तसेच CAP प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करण्यासाठी स्वतंत्र प्रवेश सहाय्य केंद्र दिवसभर कार्यरत आहे.
बीसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी १६ जुलैपूर्वी ऑनलाइन नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या उज्ज्वल करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
बीसीए अभ्यासक्रमासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२६३-२५५२०० वर संपर्क साधावा किंवा महाविद्यालयाच्या www.gsck.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शनासाठी संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. ए. तायडे (मो. 9823577006) तसेच प्रा. एन. पी. तांबट (मो. 8275027897) यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी केले आहे.

 

contributor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *