बीड (प्रतिनिधी) – येथील नामवंत आदित्य आयुर्वेद कॉलेज एंड रिसर्च सेंटर चा विद्यार्थी मोमीन फैजान अब्दुल जुनैद याने नुकतेच जाहीर झालेल्या बीएएमएस च्या अंतिम वर्षात 61.54% गुण घेत प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे.
मोमीन फैजान हा बीड शहरातील मुख्य डाकघरात कर्तव्यावर असलेले पोस्टल असिस्टंट मोमीन अब्दुल जुनैद यांचा मुलगा असून वडिलांनी मोठ्या मेहनतीने व कष्टाने आर्थिक भार उचलत मोमीन फैजान ला दिलेल्या शिक्षणाचे चीज केले आहे. फैजान ने बीएएमएस च्या अंतिम वर्षात 61.54% गुण घेऊन प्रथम श्रेणीत यश मिळविल्याने सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दिकी, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवाराने त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.
