मिल्लीया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा
बीड: येथील मिल्लिया कला,विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जेंडर सेन्सीटायझेशन सेलच्या वतीने दिनांक 08 मार्च 2026 रवीवार रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील जेंडर सेन्सिटायझेशन सेलच्या वतीने विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या हस्ते बीड मधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जेंडर सेन्सीटायझेशन सेलच्या अध्यक्षा तथा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सीमा हाश्मी यांनी सांगितले की, समाजामध्ये महिला बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल समाज व विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस.एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


