*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक*
: *_अलहूदा उर्दू प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात_
बीड :(खान अस्मा रईस खान)
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी खेळांचे महत्त्व असाधरण आहे. खेळामुळे विद्यार्थी मध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास व आरोग्यचा विकास होतो या उद्देशाने अलहूदा उर्दू प्राथमिक शाळा, बीड येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे प्रत्येक वर्षी आयोजन होतो. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यासंबंधी अधिक माहिती अशी की, अलहुदा उर्दू प्राथमिक शाळा बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये रनिंग रेस, लिंबू रेस, वन-मिनिट गेम, बॉल इन बकेट, चेअर रेस तसेच कबड्डी व खो-खो यांसारखे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत क्रीडास्पर्धांचा आनंद घेतला. इयत्तानुसार विविध गट तयार करून पहिली व दुसरी, तिसरी व चौथी तसेच पाचवी-सहावी-सातवी अशा गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक खेळात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे स्पोर्ट्स इन्चार्ज म्हणून कादरी परवेज सर यांनी उत्कृष्ट नियोजन केले. त्यांना मिर्झा शारेख बेग सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे खेळांचे नियोजन करून प्रत्यक्ष स्पर्धा घेतलेल्या. यामध्ये सय्यद मोहम्मद नदीम सर, सय्यद कैसर अली सर, शेख परवेज अहमद सर, सिद्दीकी हिना कौसरबाजी, नाझनीनबाजी तसेच खुदसियाबाजी यांनी विशेष योगदान दिले.
शाळेचे मुख्याध्यापक मोमीन अब्दुल जफर सर यांनी संपूर्ण कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कादरी परवेज सर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद अर्शियानुल्ला सर (बॉडी बिल्डर व कोच, लाइफ हेल्थ क्लब, बीड), डॉ. अब्दुल समी, डॉ. अब्दुल गफ्फार, डॉ. निशाद, डॉ. मसरत तसेच अलहूदा उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण सिराज सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्पोर्ट्स इन्चार्ज कादरी परवेज सर यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.


