सुहानच्या कष्टांना मिळाला गौरवाचा मुकुट
बीड:(खान अस्मा रईस खान)
स्कूल ऑफ स्कॉलर्स, माजलगाव येथे शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत “बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर” हा मानाचा पुरस्कार सुहान शेख याने पटकावला. या गौरवपूर्ण प्रसंगी संस्थेचे संचालक ओमकार खुरपे यांच्या शुभहस्ते सुहानला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुहानने वर्षभर सातत्य, शिस्त, अभ्यासातील प्रावीण्य तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांतील सहभागातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभ्यासाबरोबरच वर्तन, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव या सर्व बाबींमध्ये तो आदर्श ठरल्यानेच त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले.
सुहानची जिद्द, मेहनत आणि चिकाटी पाहून शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग तसेच पालक वर्गातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यामागे सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते,” हे सुहानने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
हा गौरव सुहानच्या कुटुंबासाठीही अभिमानास्पद ठरला आहे. सुहान हा राजु मोगरेकर यांचा मुलगा, तसेच समीर मोगरेकर यांचा पुतणे आहे. कुटुंबातील संस्कार, मार्गदर्शन आणि पाठिंबा यामुळेच सुहानला हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पुरस्कारामुळे सुहानच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यात तो आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे.
सुहानच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


