एशिया न्यूज बीड

डॉ.अजित कुमार यांना कॅप्सेस – २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांकाचा सन्मान विद्यार्थ्यांसह युवा संशोधकांना विज्ञान व नवकल्पनांची प्रेरणा देणाऱ्या संशोधनाचे जनक

डॉ.अजित कुमार यांना कॅप्सेस – २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांकाचा सन्मान  विद्यार्थ्यांसह युवा संशोधकांना विज्ञान व नवकल्पनांची प्रेरणा देणाऱ्या संशोधनाचे जनक

डॉ.अजित कुमार यांना कॅप्सेस – २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांकाचा सन्मान

विद्यार्थ्यांसह युवा संशोधकांना विज्ञान व नवकल्पनांची प्रेरणा देणाऱ्या संशोधनाचे जनक

बीड (प्रतिनिधी) – शहरातील रामानुजन ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे संस्थापक व संचालक तसेच आर२ई टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक (संशोधन व नवोपक्रम)असलेले डॉ.अजित कुमार यांनी पर्यावरणीय शाश्वततेसाठी रासायनिक व भौतिक विज्ञानातील आघाडीवरील संशोधन आंतरराष्ट्रीय परिषद (कॅप्सेस–२०२६) या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ही आंतरराष्ट्रीय परिषद ३०व३१ जानेवारी २०२६. एम.एस.पी. मंडळाचे बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, येथे रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यात पर्यावरणीय शाश्वततेसाठी रासायनिक व भौतिक विज्ञानातील संशोधनावर आधारित विविध सत्रांमध्ये देश-विदेशातील संशोधक व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

या परिषदेस एम.एस.पी. चे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सचिव सतीश चव्हाण आणि उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. आयोजन समितीत डॉ.ए.डी.चिंधे (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक), प्रा.डॉ.बी.डी.कोकाटे (उपप्राचार्य) आणि प्रा.डॉ.एस.एस.उंदरे (प्राचार्य व मुख्य संयोजक) यांचा समावेश होता.

कॅप्सेस २०२६ या परिषदेत सुमारे ३०० संशोधन पेपर्स निवडले गेले होते. या स्पर्धात्मक वातावरणात डॉ. अजित कुमार यांच्या संशोधन कार्याने वैज्ञानिक गुणवत्ता, नवकल्पना आणि व्यावहारिक उपयुक्तता यामुळे विशेष लक्ष वेधले आणि त्यांना संशोधन पेपर सादरीकरणामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले.

मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, संश्लेषित अपर्चर रडार, कृत्रिम बुद्धिमत्ता व अनुप्रयुक्त संशोधन या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे या यशाने स्थानिक संशोधन क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे. पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधन यांचा संगम आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

कॅप्सेस – २०२६ मधील हा सन्मान त्यांच्या संशोधन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांना आणि युवा संशोधकांना विज्ञान व नवकल्पनांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *