एशिया न्यूज बीड

थकीत देयके निकाली काढा- आत्माराम वाव्हळ 

थकीत देयके निकाली काढा- आत्माराम वाव्हळ 

थकीत देयके निकाली काढा- आत्माराम वाव्हळ

बीड:( खान अस्मा रईस खान)

बीड दि.८: मागिल काही वर्षांपासून प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांचे थकीत देयके निधी अभावी शासनाने निकाली काढले नाहीत. या थकीत बिलासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देत थकित बिले लवकरच म्हणजे या वर्षी निकाली काढावेत अशी मागणी विना अनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांचे थकीत देयके बाकी आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ही थकित देयके शासनाने निकाली काढले नाही, दरवर्षी थकीत बिल टाकले जाते सन २०२४-२५ मध्ये डायरेक्टर लेवलला गेलेले परंतु निधी अभावी बरेच बिले रिजेक्ट करण्यात आले, परत थकीत बिल टाकण्यासाठी सूचना दिल्या, सन २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा थकीत देयके सादर केली परंतु संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच कर्मचाऱ्यांचे थकीत देयके बाकी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयात थकीत देयके सादर केले, संबंधित कार्यालय थकीत देयके चेक करून पुढे पाठवणार आहे, परंतु त्यांना

कालावधी कमी असल्यामुळे आम्हाला आमचे बिल रिजेक्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील वेतन पथक कार्यालयाला बिल चेक करण्यासाठी जास्त (वेळ) कालावधी द्यावा जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांचे बिल व्यवस्थित चेक करून पुढे पाठवले जाईल, सर्व थकीत देयके शासनाने याच वर्षात निकाली काढावे. त्या साठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करून देत या वर्षात या हेडचे संपूर्ण थकीत देयके निकाली काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *