ॲड. जगन्नाथराव पवळ यांच्याकडून मुक्त पत्रकारितेचा गौरव
ज्येष्ठ उच्चशिक्षिताकडून सन्मान म्हणजे लोकमान्यतेची मोहर – एस.एम.युसूफ़
बीड:( खान अस्मा रईस खान)
बीड – शहरातील न्यू संजय मेडिकल चे संचालक फार्मासिस्ट ॲड. जगन्नाथराव पवळ यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांच्या मुक्त पत्रकारितेचा गौरव केला. याप्रसंगी ज्येष्ठ उच्चशिक्षिताकडून सन्मान म्हणजे माझ्या लेखणीवर लोकमान्यतेची मोहर असल्याची भावनात्मक प्रतिक्रिया मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड शहरातील रहिवासी असलेले एस.एम.युसूफ़ गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने मुक्त पत्रकारिता करीत आहेत. वृत्तपत्र क्षेत्रात त्यांच्या कार्याला एक तप नुकतेच पूर्ण झाले आहे. या निमित्ताने फार्मासिस्ट ॲड. जगन्नाथराव पवळ यांनी त्यांना आपल्या न्यू संजय मेडिकल स्टोअर्स मध्ये बोलावून शाल व पुष्पगुच्छ देत हृदयी सत्कार करत म्हटले की, कोणत्याही क्षेत्रात कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजासाठी झिजणे सोपे नाही आणि युसूफ़ हे गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक समस्यांवर, प्रश्नांवर निस्वार्थपणे सातत्यपूर्ण कार्य करत आहेत. ही बाब बीड शहरच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याकरिता गौरवास्पद आहे म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला असे म्हटले.


