मदर्स व्हॅली किड्स स्कूल, बालेपीर येथे ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा
बीड : मदर्स व्हॅली किड्स स्कूल, बालेपीर येथे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना वार्षिक प्रगतीपत्र (Report Card) तसेच सुट्टीचे गृहपाठ (Holiday Homework) वितरित करण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


