जळगांव (प्रतिनिधी) : भोईटे नगर, जळगांव येथील रहिवासी डॉ. उमैर रियाज देशपांडे यांनी मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय समूह येथून एम.बी.बी.एस.च्या अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. डॉ. उमैर देशपांडे यांनी एम.बी.बी.एस.च्या अंतिम परीक्षेत ६२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगांव येथील सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय राहिले असून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. उमैर हे राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू असून, खेळ आणि शिक्षण यांचा उत्कृष्ट समतोल साधत त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक, मेहनतीचा आणि संयमाची कसोटी पाहणारा असला तरी जिद्द, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या बळावर त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचा तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्याचा त्यांचा मानस आहे. पुढील वैद्यकीय उच्च शिक्षणामध्ये उत्तुंग यश संपादन करण्याचा शाश्वत संकल्प डॉ. उमैर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपले वडील रियाज सलीम देशपांडे (संचालक – देशपांडे मेडिकल, शाहू नगर) आणि आई डॉ. फरहाना यास्मीन देशपांडे यांना दिले. तसेच त्यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन, प्रेरणा आणि सातत्यपूर्ण सहकार्याचा विशेष उल्लेख केला. याशिवाय एम.बी.बी.एस. शिक्षणादरम्यान डॉ. एहतेशाम देशमुख आणि डॉ. शोएब देशमुख (अकोला) यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा लाभ झाल्याची कृतज्ञतापूर्वक कबुलीही त्यांनी दिली. डॉ. उमैर हे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख (अध्यक्ष, अभ्यास मंडळ (उर्दू), संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तसेच उर्दू विभागप्रमुख, जी. एस. महाविद्यालय, खामगाव, जि. बुलढाणा) यांचे भाचे आहेत. डॉ. उमैर देशपांडे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांमध्ये आजोबा सलीम देशपांडे, आजोबा (नाना) प्रा. डॉ. मोहम्मद तालीब देशमुख, मुजमिल पांडे,अजिज बढे, हाजी आरिफ देशमुख, मामा प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. डॉ. मोहम्मद आकिब देशमुख, आजी (नानी) हाज्जन फहमीदा जहूर हसन देशमुख, डॉ. नवीद देशमुख, डॉ. शबाना देशमुख, डॉ. एहतेशाम देशमुख, मोहम्मद अरशद देशमुख, डॉ. शोएब देशमुख, डॉ. परवेज देशपांडे, डॉ. मुईज देशपांडे, रमीज देशपांडे, अब्दुल नासिर देशमुख, ॲड. अब्दुल वहाब देशमुख, डॉ. साबीर पांडे, इंजिनीयर जुबेर पांडे, डॉ. अबरार देशमुख, डॉ. ज़ैद देशमुख, डॉ. बतूल देशपांडे, डॉ. हुमेरा देशमुख , प्रा. अस्मा शाहीन देशमुख, डॉ. सायेमा, इफ्फत अंजुम, डॉ. अफीफा नाज पांडे, माईनुद्दीन बढे,आणि डॉ. मिसबा, यांच्यासह अनेक नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतक व मान्यवरांचा समावेश आहे. सर्व आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक आणि मान्यवरांनी डॉ. उमैर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी आणि समाजोपयोगी भविष्यासाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या. वैद्यकीय क्षेत्रात प्राप्त केलेल्या या उल्लेखनीय यशामुळे डॉ. उमैर देशपांडे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीसाठी आणि समाजसेवेच्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.डॉ. उमैर देशपांडे यांच्या या यशामुळे जळगाव शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि शुभचिंतकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.