अल्पसंख्याक संरक्षण कायदा आंदोलनासाठी लोक सेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा जो पर्यंत समाजाला संरक्षण मिळणार नाही तो पर्यंत बेबाक़पणे लढणार
ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: अल्पसंख्याक संरक्षण कायदा आंदोलनासाठी लोकसेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा मी ॲड. प्रा. इलियास इनामदार राजीनामा देत आहे जो पर्यंत समाजाला संरक्षण मिळणार नाही तो पर्यंत बेबाक़पणे लोकशाही मार्गाने लढणार भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाही व कोणत्याही राजकीय सामाजिक संघटनेचा पद घेणार नाही व कोणत्याही लाभाच्या पदावर काम करणार नाही मागील पंचवीस वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात काम करत असताना व सामाजिक आंदोलनाद्वारे शिक्षण आरक्षण व संरक्षणावर दोन दोन लाखाचे मोर्चे काढले परंतु त्या आंदोलनाचा राजकीय भांडवल करुन कोणत्याही नेत्याकडे किंवा पक्षाकडे कसल्याही प्रकारचे निवडणूक तिकीट, पक्षाचे पद अथवा गुत्तेदारी मागीतलेली नाही व निवडणुकीत कोणत्याही नेत्याकडून कधी दहा रुपये घेतलेले नाही आणि यापुढेही घेणार नाही मौलाना मुफ्ती आरेफ साहेब उलेमा इकराम यांच्या समोर ईश्वराच्या (अल्लाहाच्या) घरात बसुन समाजाला एकजुट करणार व समाजासाठी संवैधानिक व लोकशाही मार्गाने संरक्षण लढा उभारणार बेमुदत उपोषण करणार असे आश्वासन दिलेले आहे आणि त्याच दिशेने काम सुरु आहे अशी माहिती ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.
देशात व राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहे जातीय दंगली मॉबलिचिंग हेटस्पिच धार्मिक स्थळांवर हल्ले करुन विटंबना करणे समाजावर बहीष्कार टाकणे सोशल मीडियावर अनाप शनाप वक्तव्य करणे जसे लांडे कठमुल्ले जेहादी हलालाच्या औलादी पाकिस्तानी बांग्लादेशी असे असंवैधानिक वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे या पासुन अल्पसंख्याक समाजाचे मुस्लिम बौध्द क्रिश्चियन जैन पारसी सिख व विशेष करुन मुस्लिम समाजाचे संरक्षण व्हावे या करिता अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती स्थापन झालेली आहे.
व ही समिती शासनाकडे संवैधानिक व लोकशाही मार्गाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा म्हणून मागणी करत आहे व रस्त्यावरचेआंदोलन व न्यायालयाद्वारे लडाई लढणार आहे.
या समितीमध्ये मी एक साधारण सदस्य व निमंत्रक आहे समाजाच्या संरक्षणासाठी येणाऱ्या बावीस जुनपासुन विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये अल्पसंख्याक संरक्षण कायदा विषय लक्षवेधी करण्यासाठी सर्व आमदारांना निवेदन देण्यात आलेले आहे व मुंबई येथील आज़ाद मैदान येथे बावीस जुनपासुन लाक्षणिक उपोषण समितीच्या वतीने करण्यात येणार आहे समाजासाठी माझे आजपर्यंतचे त्याग बलिदान व संघर्ष लक्षात घेता समाजाने या आंदोलनामध्ये निस्वार्थपणे जुडावे व समाजाला न्याय मिळवून दयावे असे आवाहन व माहिती समिती सदस्य निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.


