एशिया न्यूज बीड

आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड यांच्या पुढाकाराने शिवणी भिल्ल वस्तीवर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो लाभार्थ्यांची नोंदणी; आरोग्य संरक्षणाचा लाभ घरपोच

आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड यांच्या पुढाकाराने शिवणी भिल्ल वस्तीवर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  शेकडो लाभार्थ्यांची नोंदणी; आरोग्य संरक्षणाचा लाभ घरपोच

आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड यांच्या पुढाकाराने शिवणी भिल्ल वस्तीवर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो लाभार्थ्यांची नोंदणी; आरोग्य संरक्षणाचा लाभ घरपोच

बीड, दि. 14 (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बीड तालुक्यातील शिवणी येथील भिल्ल वस्तीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड यांच्या पुढाकारातून आणि आरोग्य मित्र वैभव भोले यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी नागरिकांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत आरोग्यसेवा, उपचार सुविधा तसेच शासनमान्य रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या लाभांची सविस्तर माहिती देण्यात आली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांसाठी आयुष्मान भारत योजना मोठा आधार ठरत असून, या योजनेमुळे लाखो रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

भिल्ल वस्तीपर्यंत प्रत्यक्ष जाऊन योजना पोहोचविणे, लाभार्थ्यांची नोंदणी करणे आणि त्यांना तात्काळ कार्ड उपलब्ध करून देण्याच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड व वैभव भोले यांचे विशेष कौतुक केले. शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

“प्रत्येक पात्र नागरिकाकडे आयुष्मान भारत कार्ड असणे ही काळाची गरज आहे. आरोग्य संरक्षणासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असून सर्व पात्र नागरिकांनी आपले आयुष्मान भारत कार्ड तातडीने काढून घ्यावे,” असे आवाहन आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड व वैभव भोले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *