- बीड जिल्ह्यासाठी ‘आपतक शिकायत मंच’ : जनतेच्या तक्रारींना थेट बातमीचा आवाज; शेख इमरोज शरीफ
बीड : बीड न्यूज आप तक (हिंदी) या स्थानिक न्यूज चॅनेलतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी ‘आपतक शिकायत मंच’ हा खास व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्यात आला आहे. शहर असो वा ग्रामीण/ भाग—वार्ड, किंवा गाव पातळीवरील कोणतीही सार्वजनिक समस्या नागरिक आता थेट या ग्रुपवर पाठवू शकतात.
नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते, नाले, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, कचरा इत्यादी मूलभूत समस्यांचे व्हिडिओ किंवा फोटो ग्रुपवर शेअर करावेत. त्यानंतर बीड न्यूज आप तक या चॅनेलवर त्या तक्रारींवर न्यूज व्हिडिओ तयार करून अपलोड केले जातील आणि संबंधित प्रशासन व जबाबदार अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाईल.
आगामी काही महिन्यांत बीड शहरात नगरपालिका निवडणुका होणार असल्याने, या मंचावरून आलेल्या तक्रारी नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्यासमोर उघडपणे मांडल्या जातील. “कोणालाही सूट नाही—तुम्ही आतापर्यंत काय केले? पुढे या समस्या कशा सोडवणार?” या थेट प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर मागवली जातील, असे चॅनेलने स्पष्ट केले.
हा ग्रुप फक्त तक्रारी आणि समस्यांसाठी राखीव आहे. त्यामुळे फॉरवर्ड, विनोदी/गैरलागू पोस्ट, राजकीय वादविवाद किंवा असंबंधित मजकूर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि बेधडक आपल्या भागातील समस्या पाठवाव्यात; आम्ही त्या नेमकेपणाने बातमीत मांडून संबंधितांपर्यंत पोहोचवू, असा विश्वास चॅनेलने व्यक्त केला.
यासोबतच, बीड न्यूज आप तक हे न्यूज चॅनल गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील लोकांच्या स्थानिक समस्यांवर सातत्याने फोकस करत आले आहे. या काळात चॅनेलकडे कोणत्या भागात/वार्डात कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत याची तपशीलवार माहिती जमा झाली असून अनेक नागरिकांशी सतत संपर्क राखला जात आहे.
‘आपतक शिकायत मंच’ या ग्रुपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रश्न योग्य पातळीवर पोहोचवण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, आपल्या वॉर्ड/भाग/गावातील समस्या नोंदवाव्यात आणि जनतेच्या हक्काच्या आवाजाला बळ द्यावे, आणि या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी या मोबाईल नंबर 76 20 346 313 या क्रमांकावर आपला नाव व पत्ता संदेशाद्वारे पाठवावा.एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेख इमरोज शरीफ यांनी जनतेला आवाहन करण्यात आले आहे.
आपला
शेख इमरोज शरीफ
संपादक बीड न्यूज आप तक
माननीय संपादक साहेब वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून ठळक प्रकाशित करावे ही नम्र विनंती


