अल खैर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थीसाठी मार्गदर्शन शिबीर व ड्रेस किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला*
बीड : अलखैर मल्टिपर्पज फाऊंडेशन बीड ही एक सामाजिक संघटना आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहे. मागील पाच वर्षांपासून अल खैर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. त्या मधून आत्ता पर्यन्त 40 विद्यार्थी हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये रुजू झाले आहे. याही वर्षी अल खैर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण बॅच 2025 चालूच आहे. या बॅच मधील विद्यार्थ्यांसाठी आज मार्गदर्शन शिबीर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस भरतीसाठी तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना ड्रेस किटचे वाटप करण्यात आले.
पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवता येईल. सोबतच या विद्यार्थ्यांना ड्रेस किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अब्दूल वकील सर होते तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणारे डॉ मोमीन मुजाहिदीन अतिरिक्त शल्य चिकित्सक, कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक डॉ अब्दूल अनीस सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शेख मुजीब साहेब, सय्यद फेरोज अली, फारूख सर, डॉ शकील सर, अरबाज पठाण, विखार सर, सैफ अली सर, माजेद खान, आतिफ सय्यद, मोहसीन करीम, शेख शाहरुख, इलियास सिद्दीकी, डॉ आकीफ अन्सारी, वसीम खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमीर खान यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार अझहर इनामदार यांनी केले.


