एशिया न्यूज बीड

औरंगाबाद पदवीधर मतदार नोंदणीसाठी रविवारी एकदिवसीय शिबीर होणार

औरंगाबाद पदवीधर मतदार नोंदणीसाठी रविवारी एकदिवसीय शिबीर होणार

औरंगाबाद पदवीधर मतदार नोंदणीसाठी रविवारी एकदिवसीय शिबीर होणार

ॲड प्रा इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: पुढच्या वर्षी मराठवाडयातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे या निवडणूकीसाठी जे मतदार पदवी पास आहे त्यांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवणे गरजेचे आहे असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख ॲड प्रा इलियास इनामदार यांनी केले आहे.

यासाठी बीडमध्ये येणाऱ्या रविवारी दि. सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत जमीयत उलेमा ए हिंद संघटनेचे कार्यालय नगर परिषद शेजारी बशीर गंज बीड येथे प्रा. अमर शेख सर यांना नोंदणी मदत म्हणून व मुज्तबा अहमद खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या नोंदणीसाठी एक दिवसीय शिबीर ठेवण्यात आले आहे तरी पदवी पास झालेल्या पदवीधरांनी आपापले नाव नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख ॲड प्रा इलियास इनामदार राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा.अमर शेख ऊर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेश सचिव मुज्तबा अहमद खान सर पत्रकार जावेद पाशा सर पत्रकार सिराज आरज़ु सर समाजसेवक सय्यद नबीलुज़मा ॲड. यासेर पटेल ॲड. शेख अज़ीम यांनी आवाहन केले आहे.

सोबत लागणारे कागद पत्र आधारकार्ड, इलेक्शनकार्ड, पदवी मार्कशीट किंवा डिग्री व एक पासपोर्ट फोटो घेवून यावे. फॉर्म भरुन देण्यात येईल. अशी माहिती प्रसार माध्यमांद्वारे लोकसेना संघटना प्रमुख ॲड प्रा इलियास इनामदार यांनी दिली आहे.

आपला

ॲड. प्रा. इलियास इनामदार

अध्यक्ष लोकसेना संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *