बीडमध्ये विजय नाना काकडे यांच्या पुढाकारातून वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम संपन्न
वाहन सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम !
बीड, दि. १७ (प्रतिनिधी)-रात्रीच्या वेळी वाहनांची दृश्यता वाढून अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या महत्त्वपूर्ण उद्देशाने विश्वगती मोटर मालक–चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वाहन सुरक्षेसाठी
वाहनांवर प्रत्यक्ष रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय नाना काकडे यांच्या पुढाकारातून
बीड जिल्हा वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक सानप साहेब, पाडळसिंगी महामार्ग पोलीस, मांजरसुंबा महामार्ग पोलीस उपनिरीक्षक ढगरे साहेब, तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) गावडे साहेब यांच्या उपस्थित घेण्यात आला .
रात्रीच्या वेळी अनेक वेळा जड व मालवाहू वाहनांची योग्य दृश्यता नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन वाहनांच्या मागील व बाजूच्या भागावर रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम विश्वगती मोटर मालक–चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय नाना काकडे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. वाहनांवर प्रत्यक्ष रिफ्लेक्टर लावल्यामुळे दूरवरूनच वाहन स्पष्ट दिसून येत असून इतर वाहनचालकांना वेळीच अंदाज येण्यास मदत होते. परिणामी अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत वाहनांवर आवश्यक सुरक्षात्मक साधने वापरण्याचे महत्त्व विशद केले. तसेच यावेळी अनेक वाहनांवर प्रत्यक्ष रिफ्लेक्टर बसविण्यात आले. या सामाजिक व उपयुक्त उपक्रमाबद्दल उपस्थित वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. प्रशासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून असे उपक्रम सातत्याने राबविले गेल्यास रस्ते अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी ट्रान्सपोर्ट धारक, वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


