शेख कलीम भाई यांचे सुपुत्र मोहम्मद कासिम हाफिज-ए-कुरआन
बीड :
कश्फाबाद येथील जामिया इस्लामिया काशिफुल उलूमच्या शाखा असलेल्या मदरसा तहफिजुल कुरआन येथून शेख कलीम भाई यांचे सुपुत्र मोहम्मद कासिम यांनी पवित्र कुरआन शरीफ पूर्णपणे मुखोद्गत (हाफिज) करण्याचा मान मिळविला आहे. या आनंदाच्या प्रसंगी मदरसा तहफिजुल कुरआनचे उस्ताद, पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी मोहम्मद कासिम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या वेळी हाफिज मन्सूर तैयबी आणि मौलाना अझमतुल्लाह शेख (अबास शिरो भाई) यांनी मोहम्मद कासिम यांचे हाफिज-ए-कुरआन झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व दुआ केली. त्यांनी सांगितले की कुरआन शरीफ हिफ्ज करणे ही अत्यंत मोठी सआदत असून, ही केवळ विद्यार्थ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे.
परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व नातेवाईकांनीही मोहम्मद कासिम यांच्या या यशाबद्दल शेख कलीम भाई व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


