एशिया न्यूज बीड

*उर्दू शाळांना स्वतंत्र DDO कोड — संघटनेच्या प्रयत्नांना यश* *जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद यांनी मानले प्रशासनाचे आभार*

*उर्दू शाळांना स्वतंत्र DDO कोड — संघटनेच्या प्रयत्नांना यश*  *जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद यांनी मानले प्रशासनाचे आभार*

📰 *उर्दू शाळांना स्वतंत्र DDO कोड — संघटनेच्या प्रयत्नांना यश*

*जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद यांनी मानले प्रशासनाचे आभार*

 

बीड |

बीड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी स्वतंत्र DDO कोड मंजूर झाल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे. अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना (जि.प. बीड) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, त्यामुळे उर्दू शाळांपुढील संच मान्यतेतील तांत्रिक अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०१३ मध्ये उर्दू व मराठी शाळा प्रशासकीयदृष्ट्या स्वतंत्र करण्यात आल्या होत्या. मात्र, काही शाळांतील शिक्षकांचे वेतन एकाच DDO कोडवरून काढले जात असल्याने शालार्थ प्रणालीतील ऑनलाइन संच मान्यतेदरम्यान उर्दू शिक्षकांची नोंद मराठी शाळांमध्ये दर्शविली जात होती. परिणामी, शिक्षक नोंदणी, वेतन मंजुरी व संच मान्यता प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण होत होते.

या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जि.प. बीड यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद अजिज, कार्याध्यक्ष खान उस्मान शाईस्ता तसेच मोमीन अलीमोद्दीन, शेख इरशान, मोमीन जावेदमिया, शेख इमरान, शेख इरफान, शेख मुजफ्फर, मो. आमेर, मोमीन साजेद, फारुकी रईस, कलीम बागे, मोमीन करीम, शेख मुस्तफा, अबुल फैज, मोमीन खैसर व इतर पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली. या प्रक्रियेत विजयकुमार समुद्रे, हकीम मन्यार आणि मोमीन नियाजी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

संघटनेच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने उर्दू शाळांसाठी स्वतंत्र DDO कोड मंजूर केला आहे. त्यामुळे आता शालार्थ प्रणालीतील संच मान्यता, शिक्षक नोंदणी व वेतन प्रक्रिया अधिक सुलभ व अचूक पद्धतीने पार पडणार आहे.

या निर्णयामुळे उर्दू शाळांमधील प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या नव्या DDO कोडमध्ये शिक्षकांची नावे समाविष्ट करण्याचे काम तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असले, तरी तेही लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद यांनी मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुंवर तसेच गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि शंकर पाटील सर यांचे विशेष आभार मानले असून, हा निर्णय उर्दू शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *