एशिया न्यूज बीड

मिल्लिया महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा  

मिल्लिया महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा   

मिल्लिया महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा.

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात जागतिक जल दिनानिमित्त अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करणे हा होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर उत्तम साळवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, सावरकर महाविद्यालय,बीड हे होते. प्रोफेसर उत्तम साळवे यांनी आपल्या व्याख्यानात पृथ्वीवरील जीवनासाठी पाण्याचे असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि जलचक्र यांचा परस्पर संबंधही त्यांनी समजावून सांगितला. विद्यार्थ्यांना पाण्याची नासाडी टाळणे, पावसाचे पाणी साठवण (Rainwater Harvesting) करणे आणि समाजात जलसंधारणाबाबत जनजागृती करणे यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच जल महोत्सवाशी संबधीत पोस्ट महाविद्यालयाच्या शोशल मिडीया हॅडलवर प्रसारीत करण्यात आले

कार्यक्रमास उपप्राचार्य प्रोफेसर शौकतुल्ला हुसैनी, कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर वारे आर.एल. प्रा. शोएब पीरजादे, डॉ. शामल जाधव, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी डॉ.रमेश वारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शोएब पीरजादे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *