एशिया न्यूज बीड

निवडणुक आयोगाने एस आई आरचे काम जमीनी वर येवुन करावे ऊंटावर बसुन शेळया हाकलू नये                            ॲड. इलियास इनामदार

निवडणुक आयोगाने एस आई आरचे काम जमीनी वर येवुन करावे ऊंटावर बसुन शेळया हाकलू नये                             ॲड. इलियास इनामदार

निवडणुक आयोगाने एस आई आरचे काम जमीनी वर येवुन करावे ऊंटावर बसुन शेळया हाकलू नये

ॲड. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: लोकसेना संघटना प्रमुख ॲड. इलियास इनामदार यांनी आज जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेवुन निवडणूक आयोगा कडुन सुरु असलेल्या एस आई आरच्या कामात अनेक त्रुटया आहेत ते दुरुस्ती कराव्या या विषयी केंद्रीय निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड मार्फत

एस.आय.आर. (SIR) प्रक्रियेतील त्रुटी दूर करून समस्यांचे निराकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर असे की देशातील विविध राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सध्या ‘एस.आय.आर.’ (SIR) प्रक्रियेचे काम बी.एल.ओ. (BLO) मार्फत सुरू आहे. मात्र, ही प्रक्रिया राबवताना सर्वसामान्य मतदारांना अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

लोकसेना संघटना निवडणूक आयोगाला मागणी करत आहे की मॅपिंग करण्यासाठी 2002 व 2005 च्या मतदार यादीमध्ये नाव आवश्यक आहे परंतु अनेकांकडे 1994, 2002 व 2005 वा त्यानंतरचे मतदान कार्ड आहे परंतु त्यांचे यादीमध्ये नाव नाही मग त्यांची मॅपिंग कशी होणार? अनेक लोकांचे 2002, 2005 व 2025 च्या यादीमध्ये नाव आहे परंतु आई पिता आजी आजोबा यांचे नाव नसल्यामुळे ते मॅपिंग करु शकत नाही कारण मॅपिंग सॉफ्टवेयरमध्ये स्वंय-सेल्फचे ओप्शन नाही मग यांना भाऊ बहीन काका चुलत भाऊ ब्लॅड रिलेशनमध्ये मॅपिंग करुन घ्यावे व बीएलओ यांना डोर टू डोर व्हीज़ीट देवुन मॅपिंग करण्याचे निर्देश असताना अनेक बीएलओ घरी झोपा मारीत बसले नाही तर शाळेचे कामे करत असल्याचे नाटकं करत आहे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बीएलओ यांना तंबी दयावी व निवडणूक आयोगाने वरील विषयावर तात्काळ दुरुस्त्या कराव्या नसता लोकसेना संघटना जन आंदोलन उभारणार आहे अशी गर्जना लोकसेना संघटना प्रमुख ॲड. इलियास इनामदार यांनी केली आहे सोबत शेख चिरागोद्दीन, इमरान फारुकी इनामदार, शेख राजु, सलीम खुर्शीद, सय्यद इरफान, साजेद तांबोली शेख मुखतार इत्यादी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *