*भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या बीडमध्ये शोकसभा*
*मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
बीड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य हाजी एजाज वहीद देशमुख यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. एक कर्तृत्ववान, मनमिळावू आणि जनतेशी नाळ जुळवून काम करणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने उद्या गुरुवार दि.26 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईस येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड शहरातील रहिवासी असलेले हाजी एजाज देशमुख हे खऱ्या अर्थाने जनसेवक होते. त्यांची साधी राहणी, आपुलकीचा स्वभाव आणि संघटनेप्रती असलेले समर्पण हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. ते केवळ नेते नव्हते, तर मार्गदर्शक, भाऊ आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी तसेच शोकाकुल कुटुंबीयांना धैर्य मिळावे यासाठी शोकसभा सभा ( कुराणखानी व खिराज-ए-अकीदत ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.26 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हॉटेल गोल्डन चॉइस, बार्शी रोड, बीड येथे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोक सभेला उपस्थित राहून मरहूम हाजी एजाज वहीद देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन हाजी एजाज देशमुख मित्रमंडळ बीड व आयोजकांनी केले आहे.


