*हिंदू-मुस्लिम ऐकतेची परंपरा बीड शहरात कायम,,*
*मरेपर्यंत एकतेसाठी काम करणार-“खुर्शीद आलम”*
बीड (प्रतिनिधी)आज रामनवमी निमित्त नगरसेवक शेख अफसर भाई आणि नगरपरिषदेचे गटनेते खुर्शीद आलम यांनी मुस्लिम समाजातर्फे बार्शी नाका चौक येथे पानपोईचे आयोजन केले होते, शहरात रामनवमी चे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदू बांधवांनी बीड शहरात रामनवमी रॅली चे आयोजन केले होते. रॅली मध्ये सर्व रामभक्तंना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून खुर्शीद आलम हे दरवर्षी हिंदू बांधवांसाठी मंडप लाऊन पिण्याचे पाणीची व्यवस्था करतात, दरवर्षी प्रमाणेच याही बीड नगरपरिषदेचे गटनेते खुर्शीद आलम आणि नगरसेवक शेख अफसर यांनी मुस्लिम समाजा तर्फे हिंदू बांधवांसाठी पाणपोई चे आयोजन केले आहे, सदर पानपोईला सर्व राजकीय. सामाजिक व्यक्तीनी भेट देऊन गटनेते खुर्शीद आलम आणि नगरसेवक शेख अफसर यांचे कौतुक केले आहे, मिडियाशी बोलताना खुर्शीद आलम म्हणाले की आपण हिंदू मुस्लिम एकामेकांच्या सुखा दुःखात सामील होऊन एकजुटीने राहतोय हिच आपण सर्व भारतीयांची खरी ताकत आहे आणि मरे पर्यंत आम्ही सर्व भारतीय एकजुटीनेच राहणार असे सांगितले आहे, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मैनोद्दीन भाई, शेख नजीर भाई, मसी सेठ, मोमीन शहेबाज, साजेद भाई, जाबेर कुरेशी, नवीद भाई, शहेजाद सौदागर, शेख शम्मो भाई, योनुस भाई बागवान, करीम खान यांच्यासह इतर मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले आहे,


