एशिया न्यूज बीड

ना. पंकजाताईंकडून हाजी एजाज देशमुख यांच्या सलीम जहाँगीर यांचा पुढाकार ; शोकसभेस ना. पंकजाताई , जमाल सिद्दीकींसह मान्यवरांची उपस्थिती कुटुंबाला 5 लाखांची मदत ; शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा 

ना. पंकजाताईंकडून हाजी एजाज देशमुख यांच्या सलीम जहाँगीर यांचा पुढाकार ; शोकसभेस ना. पंकजाताई , जमाल सिद्दीकींसह मान्यवरांची उपस्थिती कुटुंबाला 5 लाखांची मदत ; शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा 

ना. पंकजाताईंकडून हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत ; शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा 

 

सलीम जहाँगीर यांचा पुढाकार ; शोकसभेस ना. पंकजाताई , जमाल सिद्दीकींसह मान्यवरांची उपस्थिती 

बीड ( प्रतिनिधी ) दिवंगत हाजी एजाज देशमुख हे मुंडे साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अविस्मरणीय योगदान दिले आहे.

त्यांच्या जाण्याने आपण मुंडे साहेबांच्या शिकवणीवर चालणारा सक्रिय आणि सच्चा कार्यकर्ता गमावला अशा शब्दात राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिवंगत हाजी एजाज देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने देशमुख कुटुंबाला 5 लाखाच्या मदत जाहीर करत हाजी एजाज देशमुख यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबवून 3 गरजू मुलींना डॉक्टर बनविण्याची घोषणा ना. पंकजाताई मुंडे यांनी केली.

महाराष्ट्र भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी बीड येथील हॉटेल गोल्डन चॉइस येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ शोकसभा आयोजित केली होती. यावेळी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय नेते जमाल सिद्दीकी, प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी, मा. आ. संजय केणेकर,डॉ. योगेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, वसीम खान,सलीम जहाँगीर, उमेर सलीम, कल्याण आखाडे, जेष्ठ संपादक काझी मकदूम, उर्दूचे कार्याध्यक्ष हसीन अख्तर, प्रा. सुशीलाताई मोराळे, ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, गटनेते फारुक पटेल, आदित्य सारडा, नवनाथ शिराळे, दिलीप गोरे, ॲड. शेख शफीकभाऊ, सय्यद नवीदुजमा, खुर्शीद आलम, जयतुला खान, नूर लाला आदींसह सर्पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत हाजी एजाज देशमुख यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. ना. पंकजाताई मुंडे भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, दिवंगत एजाज देशमुख हे मुंडे साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अविस्मरणीय योगदान दिले आहे. अत्यंत शांत आणि सतत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणारे तळमळीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या जाण्याने आपण मुंडे साहेबांच्या शिकवणीवर चालणारा सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे. दिवंगत एजाज देशमुख यांना सद्गगती लाभावी अशी प्रार्थना याप्रसंगी शोकसभेत केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिवगंत हाजी एजाज देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांची निष्ठा आणि काम करण्याची पद्धत यातून एजाजभाईंनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती अशा भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *