एशिया न्यूज बीड

*मिल्लिया गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सल्सबिला रईस खान ‘इस्लामिक क्विझ’मध्ये प्रथम* 

*मिल्लिया गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सल्सबिला रईस खान ‘इस्लामिक क्विझ’मध्ये प्रथम* 

**मिल्लिया गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सल्सबिला रईस खान ‘इस्लामिक क्विझ’मध्ये प्रथम* 

बीड (प्रतिनिधी):शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था ‘मिल्लिया गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज’ची इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी सल्सबिला रईस खान हिने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. ‘युनिक फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय “इस्लामिक क्विझ”स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावून अंजुमन इशाअत तालीम संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सल्सबिलाने या स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर सर्व शाळांमधील स्पर्धकांना मागे टाकत हे यश मिळवले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मिल्लिया ऑडिटोरियम हॉलमध्ये हा भव्य पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने विजयसिंह पंडित(आमदार गेवराई विधानसभा)

फारुख पटेल (गटनेते बीड नगरपरिषद बीड)

निजाम भाई(सभापती पती, नगर परिषद)

शफीक भाऊ(जिल्हाध्यक्ष, एमआयएम)

यांच्यासह युनिक फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि हजारो नागरिक उपस्थित होते.संस्थेकडून अभिनंदन

सल्सबिलाच्या या यशाबद्दल अंजुमन इशात तालीमचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन महफूज सचिव खान सबिया बाजी मुख्याध्यापक डॉ. सिद्दीकी इरफान सादुल्ला उपमुख्याध्यापक खुर्शीद अहमद पर्यवेक्षीका नसरीन फरहाना तसेच सर्व शिक्षक व पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *