ब्राईट सोशल फाउंडेशन चा मुस्लिम आरक्षणाला जाहीर पाठिंबा.
बीड (प्रतिनिधी):
मुस्लिम समाजाला ५% आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने आयोजित या मोर्चाला सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांचाही जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात हा एल्गार मोर्चा काढण्यात येत असून, या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता, मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


